शहरातील खरबी-वाठोडा पांदन रोड परिसरात गेल्या काही दिवसांपासून सायकल चोरीच्या घटनांनी नागरिक त्रस्त झाले आहेत. नुकतीच राधेकृष्ण अपार्टमेंट येथे एक धाडसी चोरी झाली असून, चोरट्यांनी अपार्टमेंटच्या आवारातून सायकल लंपास केली आहे. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून परिसरात दहशतीचे वातावरण आहे.मिळालेल्या माहितीनुसार, राधेकृष्ण अपार्टमेंटच्या पार्किंग परिसरात नागरिकांनी आपल्या सायकली नेहमीप्रमाणे उभ्या केल्या होत्या.