भंडारा: अवैधरित्या रेती चोरी करणारा ट्रॅक्टर पकडला ; गुढेघाट येथील घटना
पवनीचे तहसीलदार त्यांच्या पथकासह अवैध गौण उत्खनन व चोरट्या वाहतुकीवर आळा घालण्यासाठी पेट्रोलिंग करीत असताना विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरने रेतीची वाहतूक होताना आढळून आले. पथकाने ट्रॅक्टर थांबवून रेती वाहतुकीच्या परवाण्याबाबत विचारणा केली असता रेती वाहतुकीचा परवाना नसल्याने संबंधिता विरोधात रेती चोरीचा गुन्हा दाखल केल्याची घटना घडली. ही घटना गुढेघाट येथे घडली. या घटनेत ग्राम महसूल अधिकारी रंजीत सव्वालाखे (35) यांच्या तक्रारीवरून संजय देवराम कांबळे (30) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.