कळंब: शहरातील तहसील कार्यालयाच्या आवारात स्वयंरोजगार मेळाव्याचे आयोजन, महिलांचा उत्स्फूर्त सहभाग
मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त धाराशिव जिल्ह्यात विविध उपक्रम राबवले जात आहेत. त्याचाच भाग म्हणून कळंब तहसील कार्यालयाच्या आवारात स्वयंरोजगार मेळाव्याचे आयोजन झाले. या मेळाव्यात जिल्हा उद्योग केंद्र, विविध महामंडळे व शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते. अर्जदारांचा मोठा सहभाग दिसून आला तर महिलांची उपस्थितीही लक्षणीय ठरली. उपस्थितांना शासकीय योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली.