शिरपूर: शहरातील पाच कंदील परिसरात मेट्रो मोबाईल दुकानाला भीषण आग, लाखोंचे नुकसान
Shirpur, Dhule | Oct 20, 2025 शहरातील पाच कंदील परिसरात बालाजी मंदिर रस्त्यावर असलेल्या मेट्रो मोबाईल या इलेक्ट्रॉनिक दुकानाला भीषण आग लागल्याची घटना 20 ऑक्टोबर 2025 रोजी मध्यरात्री सुमारे साडे 12 वाजेच्या सुमारास घडली आहे.या आगीत लाखो रुपये किमतीचे इलेक्ट्रॉनिक साहित्य जळून खाक झाले.आगीची माहिती मिळताच वरवाडे न.पा.च्या अग्निशमन दलाने घटनास्थळी तात्काळ धाव घेत आग आटोक्यात आणली.