जालना शहरातील रामनगर पोलीस चौकी हद्दीतील गांधीनगर भागात दोन गटांमध्ये झालेल्या भांडणादरम्यान काही अज्ञात इसमांनी हातात तलवार, रॉड घेऊन सार्वजनिक रस्त्यावर दगडफेक आणि शिवीगाळ करत गोंधळ घातल्याची घटना समोर आली. या प्रकरणी गुरुवार दि. 24 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री 9 वाजता मिळालेल्या माहितीनुसार पोलीसांनी अज्ञात 5 ते 6 इसमांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी सरकारतर्फे फिर्यादी म्हणून पोलीस कॉन्स्टेबल भगवान आंबादास मुंजाळ यांनी फिर्याद दिली आहे. मुंजाळ हे डी.बी. पथकात कार्यरत आहेत.