मेहकर: त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला केल्याप्रकरणी आरोपीवर कारवाई करण्यासाठी तालुका पत्रकार संघाच्या वतीने निवेदन
नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे तीन ते चार पत्रकारांना टोल पॉईंटवर अमानुष मारहाण करण्यात आली. सदर घटनेचा अ. भा. मराठी पत्रकार परिषद संलग्नीत मेहकर तालुका पत्रकार संघाच्या वतीने निषेध करून सदर प्रकरणात नाशिक पोलिसांकडून आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.परंतु टोल वसुली करणाऱ्या ए. एस. मल्टी सर्विसेसच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल करून सदर कंपनीला ब्लॅक लिस्टमध्ये टाकून राज्यभरात कुठलाही ठेका दिला जाऊ नये.असे निवेदन मेहकर तालुका पत्रकार संघाच्या वतीने देण्यात आले