मुळा धरण क्षेत्रातील वांबोरी चारी लाभार्थी गावांतील शेतकऱ्यांनी वांबोरी चारीला पाणी सोडून मिरी भागातील तलाव भरून द्यावेत, अशी एकमुखी मागणी युवा नेते अक्षय कर्डिले यांच्याकडे केली आहे. संबंधित अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधत माहिती घेत लवकरच जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून या चारीसाठी पाणी सोडले जाईल असे अक्षय कर्डिले यांनी शेतक-यांना आश्वासित केले आले.