खुलताबाद: खुलताबाद नगरपरिषदेची आरक्षण सोडत जाहीर;दहा प्रभागांतील २० नगरसेवक जागांसाठी आरक्षण निश्चित
२०२५ मधील नगरपरिषद निवडणुकीची दिशा स्पष्ट झाली असून, बुधवारी (ता.८) नगर परिषद सभागृहात प्रभागनिहाय आरक्षण सोडत पार पडली. या सोडतीसाठी नागरिक, राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती. उपजिल्हाधिकारी एकनाथ बंगाळे, तहसीलदार स्वरूप कंकाळ आणि मुख्याधिकारी शेख समीर यांच्या उपस्थितीत सोडत पार पडली.या सोडतीत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले आहे.