रामटेक हे एक प्राचीन धार्मिक पर्यटन, तीर्थस्थळ आहे. येथे प्राचीन राम मंदिर असल्याने रामटेकला महाराष्ट्राची अयोध्या मानली जाते. येथे प्रति दिन हजारो भाविक भक्त येतात. परंतु येथे भक्तांसाठी राहण्याची व्यवस्था नाही. ही रामटेकची मोठी समस्या असून ही व्यवस्था रामटेकवासी यांनी संधी दिल्यास प्राथमिकतेने करण्यात येणार असल्याचा विश्वास नगरपरिषद रामटेकचे अध्यक्षपदाचे उमेदवार आकाश ढोबळे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना गुरुवार दि. 20 नोव्हेंबरला ला सायं. 7 वा च्या दरम्यान केले.