श्री संत गजानन महाराज सेवा समिती, टिमकी यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही नागपूर ते श्री क्षेत्र रामटेक 'पायी पालखी व दिंडी सोहळ्याचे' आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा शनिवार, ३ जानेवारी पहाटे टिमकी येथून भक्तीमय वातावरणात मार्गस्थ झाला.पालखी नागपूरहून निघून कामठी, कन्हानमार्गे ६ जानेवारीला रामटेक येथे पोहोचेल रनाळा येथील रनाळा चौकात आज दुपारी एक वाजता या दिंडीचे जंगी स्वागत करण्यात येणार आहे.