अमळनेर: हेडावे रस्त्यावर आयशरने दुचाकीवरील तिघांना उडविले; दोन जागीच ठार, एक जखमी
अमळनेर शहरापासून जवळ असलेल्या हेडावे रस्त्यावर एक मोठा अपघात झाला आहे. यात भरधाव आयशर ट्रकने दुचाकीवरील तिघांना उडविल्याची धक्कादायक घटना गुरूवारी २५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली आहे. या भीषण अपघातात दोन जण जागीच ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच रस्त्यावरील वाहन धारकांनी मदत कार्य सुरू केले असून जखमीस अमळनेर ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्याचे काम सुरू होते.