राहुरी: तालुक्यात दहशत निर्माण करून दरोडा टाकणारी टोळी तीन महिन्याकरता हद्दपार
राहुरी तालुक्यामध्ये दहशत निर्माण करुन गंभीर दुखापत करणारी व दरोडा टाकणारी टोळी तीन महिन्यासाठी हद्दपार केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी आज बुधवारी दुपारी दिली आहे.टोळी प्रमुख नितीन भाऊसाहेब कदम, स्वप्नील रमेश बोरुडे, गणेश नामदेव आघाव, मिलींद दत्तात्रय हरिश्चंद्रे यांना अहिल्यानगर जिल्हयातुन तीन महिन्याकरीता हद्यपार केल्याचे आदेश पारीत केले आहेत. यातील टोळी प्रमुख व टोळी सदस्य यांच्यावर राहुरी पोलीस ठाण्यात विविध १० गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.