कुरखेडा: दूचाकी अनियंत्रित होत झालेल्या अपघातात एक ठार एक गंभीर जखमी,मोहगांव साधूटोला फाट्याजवळ अपघात
कूरखेडा - पलसगड मार्गावर मोहगांव जवळ असलेल्या साधूटोला फाट्याजवळ आज दि.२५ सप्टेबंर गूरूवार रोजी दूपारी ४ वाजेचा सूमारास ट्रक्टरला साइड देण्याचा प्रयत्नात दूचाकी अनियंत्रित होत दूचाकी स्वार रस्त्यावर पडल्याने एकाचा डोक्याला गंभीर दूखापत होत त्याचा जागीच मृत्यु झाला तर एक गंभीर जखमी झाल्याने त्याला उपजिल्हा रूग्णालय कूरखेडा येथे दाखल करण्यात आले आहे.