दिग्रस: शहरातील स्मशानभूमीजवळ विनापरवाना रेती वाहतूक करणारा ऑटो जप्त, दिग्रस पोलिसांची कारवाई
दिग्रस शहरातील स्मशानभूमी परिसरात विनापरवाना रेती वाहतूक केल्याप्रकरणी दिग्रस पोलिसांनी २१ नोव्हेंबर रोजी दुपारी सुमारे ४.३० वाजता कारवाई करत ऑटो चालकावर गुन्हे दाखल केले आहे. गोपनीय माहितीवरून दिग्रस पोलिसांनी सापळा रचत छापा टाकला असता ऑटोद्वारे रेती वाहतूक करत असल्याचे निदर्शनास आले. या कारवाईत ५० हजार रुपये किमतीचा ऑटो तसेच २ हजार रुपये किमतीची रेती असा एकूण ५२ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आली. आरोपी ऑटोचालक शेख अशपाक याच्याविरुद्ध पोलीसांनी गुन्हे दाखल केले.