गुरुवार दिनांक 8 जानेवारीला सकाळी दहा वाजताच्या दरम्यान गांधी चौक रामटेक येथील जामनगर वाला मिष्ठान्न भंडार येथे नाश्ता करण्यासाठी आलेल्या एका दाम्पत्याचा मोबाईल कोणी अज्ञात व्यक्तीने चोरल्याची घटना समोर आली आहे.माहितीप्रमाणे जामनगरवाला रामटेक येथे शामराव किशनराव घोडके रा. जिंतूर,परभणी हे आपल्या पत्नीसोबत नाश्ता करावयास आले होते.तिथेच मोबाईल चोरीस गेल्याची तक्रार त्यांनी पो. स्टे. रामटेकला केली आहे.