दिंडोरी तालुक्यातील बाडगीचा पाडा शिवारातील गट नंबर ५८ मध्ये तात्याबा तुकाराम गायकवाड यांच्या शेतातील सुमारे 30 ते 35 फूट खोल विहिरीत मंगळवार (दि.१६) रोजी आठ ते नऊ महिन्यांचा नर बिबट्या पडल्याची घटना घडली. सकाळी शेतात गेलेल्या नागरिकांना विहिरीत हालचाल दिसून आल्याने त्यांनी पाहणी केली असता बिबट्या अडकलेला असल्याचे निदर्शनास आले. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.