आज दिनांक 28 ऑक्टोबर 2025 वार मंगळवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास भोकरदन तालुक्यातील पारध परिसरामध्ये परतीच्या पावसाने हजेरी लावली या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांनी खरिपात असलेली मका ही काढणी करून कणसे जमिनीवर टाकली होती यावेळी परिसरात अवश्य झाल्याने पूर्ण शेतांना तलावाचे रूप आले व यात मकाचे पूर्ण कणसे हे पाण्याखाली गेल्याचे चित्र पारध परिसरात पाहायला मिळाले यामुळे शेतकरी त्रस्त झाला असून प्रशासनाने याची तात्काळ पंचनामे करण्याची मागणी केली जात आहे.