वाशिम: मालेगाव येथील एमसीसी क्रिकेट मैदानावर धम्मचक्र प्रवर्तन सोहळा उत्साहात संपन्न
Washim, Washim | Oct 30, 2025 मालेगाव येथील एमसीसी क्रिकेट मैदानावर दि. 30 ऑक्टोबर रोजी युवा नेते ऍड. संदिप ताजणे व अविनाश वानखेडे यांच्या नेतृत्वात धम्मचक्र प्रवर्तन सोहळा उत्साहात संपन्न झाला. यावेळी मुख्य अतिथी म्हणून टि.व्ही. मालीकेत बुध्दांची भूमिका साकारणारे गगनजी मलीक यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. सदर कार्यक्रमास जिल्हाभरासह संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या मान्यवर व नागरिकांची उपस्थिती लाभली होती.