वाशिम: शाळा व्हॅनमधून लहान मुलगी रस्त्यावर पडली; पालकांचा संताप, आरटीओ विभागावर प्रश्नचिन्ह.
Washim, Washim | Oct 31, 2025 जिल्ह्यात पुन्हा एकदा शाळा व्हॅन्सच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुढे आला आहे. शहरातील एका नामांकित शाळेच्या व्हॅनमधून आज सकाळी एक लहान मुलगी अचानक रस्त्यावर पडल्याची धक्कादायक घटना घडली. सुदैवाने, मोठा अपघात टळला; मात्र या घटनेने पालकांमध्ये संतापाची लाट उसळली असून शाळा व्यवस्थापन आणि आरटीओ विभागाच्या निष्क्रीयतेवर तीव्र प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.