अलिबाग: अलिबाग येथे प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करुन संविधान दिन उत्साहात साजरा
Alibag, Raigad | Nov 26, 2025 26 नोव्हेंबर रोजी देशभरात साजरा होणाऱ्या संविधान दिनानिमित्त जिल्ह्यात विविध उपक्रमांच्या माध्यमातून संविधानाबद्दल जनजागृती करण्यात आली. यावेळी उपजिल्हाधिकारी (सा.प्र.)डॉ.रविंद्र शेळके, सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण, सुनील जाधव यांनी अलिबाग येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून संविधान दिन कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर अधिकारी-कर्मचारी, विद्यार्थी आणि नागरिकांनी संविधानाच्या प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन केले. श्री.शेळके यांनी संविधानातील मूल्ये, महत्व आणि नागरिकांची कर्तव्ये याबाबत उपस्थिातांना मार्गदर्शन केले. तसेच 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताची स्वतंत्र राज्यघटना अंगीकृत व अधिनियमित करण्यात आली होती. त्यानंतर राज्यघटना 26 जानेवारी 1950 पासून लागू झाली. त्या दिवसाचे औचित्य साधून संविधान दिनाचे आयोजन करण्यात आले, असेही त्यांनी यावेळी सांगितले.