रामायण, महाभारत आजही प्रासांगिक वेध, उपनिषद, महाभारत, रामायण याचा अभ्यास करून विदेशातील लोक प्रेरणा दायी व्याख्यान देत पैसे कमवत आहे. परंतु आपण हा फक्त आमचा वारसा म्हणून मिरवतो. त्यातुन आपण काहीही शिकलो नाही. तर गौरवशाली विरासत असून ती आजही प्रासांगिक असल्याचा सूर ' कालातीत भारत : इतिहास, सांस्कृतिक वारसा आणि सत्य ' या विषयावरील संवादत उमटला. आयाम गोदावरी नाशिक तर्फे आयोजीत संवाद गोदावरी या कार्यक्रमात लेखक निलेश ओक, मेजर मोहिनी गर्गे व आमी गणात्रा यांनी आपले मत मांडले.