साक्री: पिंपळनेर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूकीसाठी दाखल उमेदवारांच्या अर्जांची छाननी प्रक्रिया पूर्ण
Sakri, Dhule | Nov 18, 2025 पिंपळनेर नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी आज मंगळवारी दुपारी पूर्ण झाली आहे.नगराध्यक्ष पदासाठी एकूण 12 अर्ज दाखल झाले होते, त्यापैकी 6 अर्ज वैध ठरले असून 6 अर्जांना छाननीदरम्यान अपात्र ठरवण्यात आले.तर नगरसेवक पदासाठी दाखल झालेल्या 191 नामांकन अर्जांपैकी 104 अर्ज वैध ठरले असून 87 अर्ज फेटाळण्यात आले आहेत.यामुळे निवडणूक प्रक्रिया अधिक स्पष्ट झाली असून सर्व क्षेत्रांत राजकीय चर्चांना उधाण आले आहे.