श्रीगोंदा: श्रीगोंदा व नगर तालुक्यातील ग्रामस्थांना सुंदर विक्रम पाचपुते यांचे आवाहन…
श्रीगोंदा व नगर तालुक्यातील ग्रामस्थांना सुंदर विक्रम पाचपुते यांचे आवाहन…! आपल्या श्रीगोंदा तालुका व नगर तालुक्यातील काही भागांमध्ये अचानक पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे सर्व ग्रामस्थांनी अत्यंत सतर्क राहावे, ही विनंती ! अनावश्यक कारणांसाठी घराबाहेर पडू नये. अत्यावश्यक व महत्त्वाचे काम असेल तरच बाहेर पडावे. आपली सतर्कता आणि सावधगिरी हीच या परिस्थितीत आपले सर्वात मोठे संरक्षण आहे.