डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अधिनस्त किल्ला येथील विज्ञान केंद्रात मंगळवारी 1 जुलै रोजी सकाळी 11 वा. कृषी दिन म्हणून विविध उपक्रमाद्वारे साजरा करण्यात आला. प्रारंभी केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. मनोज तलाठी यांच्या हस्ते माजी मुख्यमंत्री, हरित क्रांतीचे प्रणेते कै. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.कृषी दिनी वृक्षारोपण डॉ मनोज तलाठी, रविंद्र वाघमारे यांच्या यांच्या उपस्थितीत पार पडले.