शहरातील सिताफल्ली येथील कब्रस्तान हायमास्ट लाईट लावण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी पालकमंत्री दत्तामामा भरणे यांना दि. 05 नोव्हेंबर रोजी निवेदन दिले आहे. त्यांनी निवेदना पुढे नमूद केले की, सिताफल्ली मुस्लीम कब्रस्तान येथे अंत्यविधीकरीता रात्री बेरात्री जावे लागते तरी कब्रस्तानमध्ये आवश्यक तिथे पथदिवे (हायमास्ट लाईट) लावण्यात यावे, जेणेकरुन नागरिकांना सुविधा मिळेल. तरी सामाजीक व मानवतावादी समस्येची नोंद घेवून निवेदनाची दखल घेण्याची मागणी त्यांनी केली आहे.