पत्नी यात्रोत्सवात गेलेली असतांना घरी एकट्याच असलेल्या प्रभाकर हिंमत धनगर (वय ४२, रा. नंदगाव, ता. जळगाव) यांनी गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना मंगळवारी २५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास नंदगाव येथे राहत्या घरी घडली. याप्रकरणी याप्रकरणी रात्री ११ वाजता तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.