खेड: निघोजे वाहनाच्या धडकेत वृद्ध महिला गंभीर जखमी, महाळुंगे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Khed, Pune | Sep 24, 2025 चाकण एमआयडीसी मध्ये निघोजे (ता. खेड) गावाच्या हद्दीत बैलपोळ्याची मिरवणूक पाहण्यासाठी रस्त्यावर उभ्या असलेल्या एका वृद्ध महिलेला एका भरधाव क्रेटा गाडीने धडक दिली. या अपघातात महिला गंभीर जखमी झाली आहे. ही घटना रविवारी (दि.२१ सप्टेंबर रोजी) सायंकाळी ६ वाजता घडली. शाबीरा हुसेन पठाण (६१) असे जखमी महिलेचे नाव आहे.