पोलीस ठाणे एम.आय.डी.सी. हद्दीत, प्रभाग क. १, रक्षक नगर ले-आऊट, वानाडोंगरी येथे राहणारे तक्रारदार हरदीप चैनलाल राहांगडाले, वय ३६ वर्षे हे त्यांचे राहते घराला कुलुप लावुन त्यांचे सासुरवाडीला बालाघाट येथे गेले असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीचे राहते घराचे मुख्य दाराचे कुलूप, कडी कोंडा तोडुन, घरात प्रवेश करून, किचनमधील आलमारीचे लॉकर तोडुन, त्यामधील रोख ३,३०,०००/-रू. चोरून नेले.