बुलढाणा: सरकारने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून संपूर्ण कर्जमाफी करावी - शेतकरी नेते रविकांत तुपकर
अतिवृष्टी आणि महापुरामुळे राज्यातील तब्बल 31 लाख 64 हजार हेक्टरवरील पिके उध्वस्त झाली आहेत. शेतकऱ्यांचा संसार कोलमडला आहे, कर्जाचा डोंगर वाढला आहे.पण सरकारने केवळ 2215 कोटींची तुटपुंजी मदत जाहीर केली आहे, ज्यात शेतकऱ्यांना एकरी 3400 आणि हेक्टरी फक्त 8500 रुपये मिळणार आहे, मदतीत शेतकऱ्यांचा खर्चही निघत नाही. सोयाबीन पिकासाठी एकरी साडेसात हजारांचा खर्च येतो.