अर्जुनी मोरगाव: अर्जुनी मोरगाव तालुका सरसकट अतिवृष्टीग्रस्त घोषित करून दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीचे जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यात गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या अवकाळी पावसामुळे भातासह इतर खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी वर्गावर आर्थिक संकट कोसळले असून, तालुका सरसकट अतिवृष्टीग्रस्त घोषित करून दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गोंदिया जिल्हा ओबीसी सेलतर्फे करण्यात आली आहे. याबाबतीत मुख्यमंत्र्यांच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.