उपराजधानीत क्रिकेटचा उत्साह शिगेला पोहोचला असून आगामी भारत विरुद्ध न्यूझीलंड टी-२० सामन्यासाठी नागपूरकर अक्षरशः वेडे झाले आहेत. जामठा येथील व्हीसीए स्टेडियमबाहेर आज पहाटेपासूनच तिकीट मिळवण्यासाठी हजारो क्रिकेटप्रेमींनी रांगा लावल्या असून, संपूर्ण परिसरात जणू उत्सवाचे स्वरूप आले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, तिकीट विक्री सुरू होण्यापूर्वीच अनेक चाहत्यांनी स्टेडियमवर धाव घेतली