गोरेगाव: निंबा येथे आदर्श शिक्षक मोहन बिसेन यांचा शालेय व्यवस्थापन समितीने केला सपत्नीक सत्कार
दि.23 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास निंबा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक मोहन बिसेन यांना अलीकडेच जिल्हा आदर्श पुरस्कार मिळाला. शिक्षक मोहन बिसेन यांच्या कार्याची दखल घेत निंबा येथे शालेय व्यवस्थापन समिती, माता पालक संघ, शिक्षक पालक संघ व पालकांनी स्वखर्चातून अतिशय भव्य कार्यक्रमाचे नियोजन करून शिक्षक मोहन बिसेन यांचा सपत्नीक सत्कार केला. यावेळी निंबा ग्रामपंचायतच्या सरपंच वर्षा विजय पटले शालेय व्यवस्थापन समिती,माता पालक संघाचे पदाधिकारी व शिक्षक उपस्थित होते.