दापोली: बोरघर मोहल्ला व चिंचघर प्रभुवाडी या दोन ठिकाणी एकाच रात्री अजस्त्र अजगरांना देण्यात आले जीवदान
खेड तालुक्यातील बोरघर, मोहल्ला व चिंचघर, प्रभुवाडी या दोन वेगवेगळ्या ठिकाणी एकाच रात्री दोन महाकाय अजगर साप नागरिकांच्या नजरेस पडले. स्थानिक नागरिकांनी तात्काळ वनविभागाशी संपर्क साधला असून वनविभागाच्या पथकासह छत्रपती वाईल्ड लाईफ फाऊंडेशनच्या सदस्यांनी या अजस्त्र अजगरांचा यशस्वी रेस्क्यू करून त्यांना पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात यश मिळवले आहे. ही घटना १५ सप्टेंबर रोजी रात्री घडली. सुमारे रात्री ८ वाजण्याच्या सुमारास बोरघर येथील रहिवाशांना सुमारे नऊ फूट लांबीचा महाकाय अजगर आढळून आला