नागपूर हिवाळी अधिवेशनात आमदार रत्नाकर गुट्टे यांनी शनिवारी २९३ अन्वये, अंतिम आठवडा प्रस्तावावर आपली स्पष्ट भूमिका मांडली. तसेच महायुती सरकारच्या कामाचे तोंडभरून कौतुक केले. शिवाय, आपल्या गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न, समस्या व अडचणींकडे राज्य शासनाचे लक्ष वेधले.