अड्याळ-अर्जुनी मोरगाव मार्गावर किटाडी गावालगत भरदिवसा एका महाकाय वाघाने एसटी बससमोर दर्शन दिल्याने प्रवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. बस समोर अचानक वाघ आल्याने प्रवाशांची एकच तारांबळ उडाली, मात्र बस चालकाने अत्यंत प्रसंगावधान राखून गाडी थांबवली आणि वाघ रस्ता ओलांडून जाईपर्यंत संयम पाळला. वाघाच्या या डरकाळीचा आणि संचाराचा थरार बस वाहक विलास मेश्राम यांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला असून, हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.