जालना: जालना शहरातील मोची गल्लीतील बेकायदेशीर कत्तलखाना बंद करण्याची मागणी; धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप
Jalna, Jalna | Oct 27, 2025 जालना शहरातील लक्ष्मीनारायण पूरा येथील मोची गल्ली परिसरात सुरू असलेला बेकायदेशीर कत्तलखाना तात्काळ बंद करण्यात यावा, अशी मागणी देशपरी माता संस्थानचे उपाध्यक्ष दिलीप कुरील यांनी केली आहे. सोमवार दि. 27 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार अवैध कत्तलखाना देशपरी माता मंदिराजवळ असून मंदिर ट्रस्टच्या दोन घरांलगत विनापरवाना मांस विक्री दुकान व कत्तलखाना सुरू आहे. या ठिकाणामुळे धार्मिक भावना दुखावल्या जात असून परिसरातील शांतता भंग होत आहे, असे कुरील यांनी सांगितले.