शेवगाव: शेवगावात पोलिसांचा सर्जिकल स्ट्राईक – गुप्त कत्तलखाने जमिनदोस्त..!
शेवगाव शहरातील गुप्त कत्तलखाने पोलिसांनी जमीनदोस्त केले आहे 3 ऑक्टोबर रोजी शेवगाव पोलिसांनी ही धडक कारवाई केली आहे. शेवगाव पोलीस ठाण्यातील गुप्त कत्तलखाने सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पहाटच्या दरम्यान हे कत्तलखाने जमीनदोस्त केले आहे. दरम्यान याप्रकरणी तीन लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून दोन आरोपींना अटक केली आहे मात्र यातील दोन आरोपी हे पळून जाण्यात यशस्वी आहे झाले आहे. याबाबत आज दिनांक 4 ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजता शेवगाव पोलिसांनी ही माहिती दिली आहे