गोंडपिंपरी: विहिरीत आढळला इसमाचा मृतदेह, हिवरा येथील घटना
गोंडपिपरी तालुक्यातील हिवरा येथील शिवारातील विहिरीत एका वृद्ध अज्ञात इसमाचा मृतदेह आढळल्याची घटना गुरूवारी उघडकीस आली. बसस्थानकापासून २०० मीटर अंतरावर सुधाकर पुलगमकर यांच्या शेतातील विहिरीत अज्ञात वृद्ध अंदाजे ६५ वर्षाच्या वृद्धाचा मृतदेह आढळल्याने थाबा पोलिसांना दिली. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी गोंडपिपरी रूग्णालयात पाठवले. रात्री ९ वाजेपर्यंत इसमाची ओळख पटली नव्हती.