करवीर: राज्य सरकार असंवेदनशील; राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा व सरसकट कर्जमाफी द्या-खासदार सुप्रिया सुळे यांची कोल्हापुरात मागणी
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आज कोल्हापूर दौऱ्यावर आल्या होत्या. त्यांनी करवीर निवासिनी अंबाबाई देवीचे दर्शन घेऊन पत्रकारांशी संवाद साधताना राज्य सरकारवर टीका केली. राज्यात पडत असल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करावा आणि सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे.दरम्यान राज्य सरकार असंवेदनशील आहे असही त्यांनी म्हटल आहे.