रामनगर पोलिस ठाण्यांतर्गत कुडवा परिसरात किरकोळ वादातून तरुणावर काठीने हल्ला करून दुखापत केल्याची घटना गुरुवारी (दि.१५) सकाळी घडली. सुधीर नरेश मेश्राम (२७, रा. वाॅर्ड क्रमांक ०२, कुडवा) हा आपल्या मित्रासोबत बसून गप्पा मारत असताना आरोपी आदेश घनश्याम आंबेडारे (२९, रा. वाॅर्ड क्रमांक ०२, कुडवा) हा हातात काठी घेऊन तेथे आला. ‘माझी चुगली का करतोस?’ असे म्हणत आरोपीने वाद घालण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर हाणामारीत होत आरोपीने सुधीरच्या डोक्यावर तसेच