गोरेगाव: शहरातील बस स्थानक चौकातील रस्त्यावर ऑटो उभा करणाऱ्या चालकावर गोरेगाव पोलिसात गुन्हा दाखल
गोरेगाव येथील बस स्थानक चौकातील रस्त्यावर दिनांक 4 नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजता ऑटो क्रमांक एम एच 35 एएच 0531 या वाहनाला उभे करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या चालक आरोपी चंद्रसेन मेश्राम राहणार घोटी तालुका गोरेगाव याच्याविरुद्ध गोरेगाव पोलिसात भारतीय न्यायसहिता कलम 285 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई पोलीस शिपाई लीलाधर चुटे यांनी केली आहे.