आज दिनांक 28 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास भगवान सहस्त्रबाहु जयंतीनिमित्त कलार समाजातर्फे अर्जुन चौक टीबीटोली येथून जयस्तंभ चौक होत बाजार भ्रमण करीत तहसील कार्यालयाच्या पुढे भव्य शोभायात्राचे आयोजन करण्यात आले होते. या शोभायात्रेचे तहसील कार्यालयाच्या पुढे समापन करण्यात आले. त्यानंतर महाआरती करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येत कलार समाज बांधव उपस्थित होते.