शिरपूर: शहरातील रामसिंग नगर परिसरात स्त्री जातीचे अर्भक मयतावस्थेत आढळले, परिसरात एकच खळबळ
Shirpur, Dhule | Oct 14, 2025 शिरपूर शहरातील रामसिंग नगर परिसरात 14 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी सुमारे 8 वाजेच्या सुमारास एका स्त्री जातीचे अर्भक आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.घटनेची माहिती मिळताच शहर पोलिस अधिकाऱ्यांच्या पथकाने घटनास्थळी दाखल होत पाहणी केली तसेच तौसीफ पठाण खान यांनी सकाळी सुमारे साडे 9 वाजेच्या सुमारास सदर अर्भकाला शहरातील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.मात्र, तपासणीअंती डॉ. राहुल लांबोळे यांनी अर्भकास मृत घोषित केले.पुढील तपास शहर पोलीस करीत आहे.