मोहाडी तालुक्यातील फिर्यादी विवाहित महिला हि आपल्या घराच्या सुरक्षा भिंतीला लागून असलेल्या मातीवर पाणी टाकत असताना तो पाणी आरोपी राजू सोनेवाने यांच्या अंगणात गेला. यावेळी आरोपीने महिलेला हटकले असता फिर्यादी महिलेने मी तुमच्या अंगणात जाणून बुजून पाणी टाकलं नाही असे बोलली. या वादातून आरोपीने फिर्यादी महिलेला लोखंडी सळाखीने मारहाण केली तसेच जीवाने मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी फिर्यादी महिलेच्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध करडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.