गोंदिया: अदासी येथे ग्रामस्वच्छता संघाच्या वतीने स्वच्छता अभियान, ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन
Gondiya, Gondia | Sep 14, 2025 आज दिनांक 14 सप्टेंबर रोजी ग्राम अदासी येथे ग्राम स्वच्छता संघाच्या वतीने गावात विविध प्रजातीची झाडे लावून स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यातच ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अदाशी ग्रामपंचायतचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य गावातील गणमान्य नागरिक उपस्थित होते. यावेळी श्रमदानातून गाव स्वच्छ करण्यात आले. तसेच विविध प्रजातीची झाडे लावून वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला.