विक्रमगड: अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर तुळींज परिसरात कारवाई; 50 लाखांचे एमडी ड्रग्स जप्त, तीन आरोपींना अटक
नालासोपारा येथील तुळींज सेंट्रल पार्क परिसरात काही इसम अमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा कक्ष 2 वसईला मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तीन संशयतांना ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली असता, त्यांच्याकडे एमडी ड्रग्स हा अमली पदार्थ आढळून आला. पोलिसांनी कारवाई करत 50 लाख रुपये किमतीचे 250 ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त केले आहे. तीन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या विरोधात तुळींज पोलीस ठाण्यात एनडीपीएस ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.