सांगोला: शहरात अतिवृष्टीचा तडाखा; नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळावे- मुख्याधिकारी गवळी यांचे आवाहन
सांगोला शहरासह तालुक्यात गेल्या ३ दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक सखल भागात पाणी साचले असून प्रशासनाने तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. दत्तराय नाका, डॉ. गवळी व डॉ. गावडे दवाखान्याजवळ पाणी साचल्याने मशिनरीच्या मदतीने ते बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. आमदार आणि तहसीलदार यांनी पहाटेच परिस्थितीची पाहणी केली. नगरपालिकेचे मुख्याधिकारी सुधीर गवळी यांनी नागरिकांना सुरक्षिततेसाठी पुढील ४८ तास बाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी २८ रोजी सकाळी १० च्या सुमारास संवाद साधला.