करवीर: कसबा बावड्यातील सर्वच प्रलंबित प्रश्न मार्गी लावू - आमदार राजेश क्षीरसागर
कसबा बावडा आणि शिवसेनेचे अतूट नातं असून कसबा बावडा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. कसबा बावड्यातील जनता नेहमीच माझ्या बाजूने उभी राहिली असून त्याची मला जाण आहे. त्यामुळे कसबा बावड्याच्या विकासास नेहमीच प्राधान्य दिले आहे. तसेच कसबा बावड्याच्या विकासाकरिता सदैव कटिबद्ध असल्याचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी आज म्हटले आहे.