सेलू: रेल्वेखाली आल्याने नेपाळी तरुणाचा मृत्यू; सेलू रोड ते तुळजापूर दरम्यान घडली भीषण घटना, दहेगाव पोलिसात मर्ग दाखल
Seloo, Wardha | Nov 2, 2025 सेलू रोड ते तुळजापूर रेल्वे मार्गावर एका नेपाळी नागरिकाचा रेल्वेखाली आल्याने मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दि. १ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता उघडकीस आली. संदीप अर्जुन थापा (वय ३४, रा. नेपाळगंज सैनी, जिल्हा बाके, राधापूर नेपाळ) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी सायंकाळी ५.१५ वाजता दहेगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली आहे. अशी माहिती ता. २ रविवारला दहेगाव पोलिसांनी दिली.