गोंदिया: ग्राम कालीमाती येथे गोवारी समाज बंधवांच्या पुढाकाराणे कार्तिक पौर्णिमानिमित्त तीनअंकी नौटंकी ड्रामाचे आयोजन
आज दि. 5 नोव्हेंबर रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास ग्राम कालीमाती येथे गोवारी समाज बंधवांच्या पुढाकाराणे कार्तिक पौर्णिमानिमित्त कार्यक्रमाप्रसंगी तीन अंकी नौटंकी ड्राम्याचे आयोजन करण्यात आले होते. या नौटंकी ड्रामाचे विधीवत उद्घाटन पंचायत समितीचे माजी सभापती मनोज बोपचे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपचे युवा मोर्चा अध्यक्ष रवींद्र पटले, कालीमाती ग्रामपंचायत च्या सरपंच सोनाली साखरे यासह मोठ्या संख्येत परिसरातील गणमान्य नागरिक उपस्थित होते.